आपल्या पूर्वजांचे विज्ञान - अश्रूंची झाली मुले!
अश्रूच्या माध्यमातून होणारी गर्भधारणा हा प्रकार हाताळायला थोडासा अवघड होता. म्हणून घरात लहानपणापासून आया मुलांना रडायची सवय लागू नये याची काळजी घ्यायच्या. ‘लेका मर्द आहेस. पुरुषासारखा पुरुष असून बायकोसारखा रडतोस काय’! असे संवाद घरोघरी कानावर पडायचे. घरात काही अघटित घडल्यास आजूबाजूला कोणी नाही ना, असं पाहून पुरुष एकांतात जाऊन रडून घेत असत. अजूनही बरेचसे पुरुष असंच करतात.......